परवाना नसल्याने काचुरवाही येथील दोन कृषी केंद्रांना किटकनाशके,खते,बियाणे विकण्यावर बंदी….

तालुका कृषि अधिकारी एस.एस.माने यांची कारवाई…माने यांच्या कारवाईमुळे कृषि संचालकांच्या मनात धडकी…


राजू कापसे..

रामटेक -तालुका कृषी अधिकार्‍यांनी सहकार्‍यांसह तालुक्यातील काही गावातील कृषी केंद्रांना भेट देऊन तपासणी सुरू केली.सोमवारी काचुरवाही येथील दोन कृषी केंद्रांच्या संचालकांकडे कृषी केंद्राचा परवानाच नसल्याचे आढळून आले.त्या दोन्ही कृषी केंद्रांना किटकनाशके, खते व बियाणे यांचे नुतनीकरण परवाना नसल्यामुळे माने यांनी तडकाफडकीची कारवाई करून विक्रीला बंदी घातली आहे…


तालुका कृषी अधिकारी एस.एस.माने,मंडळ कृषी अधिकारी एस.एम.सातपुते,कृषी सहायक एम.डी.कोकाटे,अशोक मेणकुदळे यांनी तालुक्यातील हातोडी,काचुरवाही,चोखाळा येथील कृषी केंद्राना भेट दिली.यातील काचुरवाही येथील रत्ना कृषी केंद्र व अंकुश कृषी केंद्र या दोन्ही कृषी संचालकांकडे खते,बियाणे,किटकनाशके विक्रीचा परवाना नसल्याचे दिसून आले.

त्यामुळे ह्या दोन्ही कृषी केंद्रांच्या संचालकांना खते,बियाणे,किटकनाशके विक्रीला बंदी करण्यात आली आहे.,या कारवाई मुळे अवैधरीत्या विक्री करणारे कृषि सेवा केंद्र संचालकाच्या मनात धडकी भरली आहे,..

विशेष म्हणजे ही दोन्ही दुकाने अनेक वर्षांपासून सुरू असून शेकडो शेतकरी या कृषी केंद्रांकडून खते,बियाणे,किटकनाशके विकत घेतात.आतापर्यंत या केंद्रांची तपासणी झाली नव्हती काय असा प्रश्न शेतकर्‍यांनी विचारला आहे….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here