कोगनोळीत उभ्या ऊसाला आग बळीराजा चिंतेत…

कोगनोळीत – राहुल मेस्त्री

एकीकडे काही वेळा ओला दुष्काळ, काहीवेळा सुखा दुष्काळ आणि यातूनच जर एखादे हंगामी पीक वाचले तर अवकाळी पावसाचे संकट पडत असते. त्यामुळे बळीराजा अत्यंत चिंतेत असून व्यथित झालेला असतो.

त्यामुळे हक्काचं पीक म्हणून शेतकरी ऊस पिकाकडे अपेक्षेने पाहत असतो. पण याच अपेक्षेने पाहिलेल्या आणि वर्षभर जपलेल्या आणि हातातोंडाशी आलेल्या पिकाचू नुकसान झालं तर बळीराजा अत्यंत मोठ्या संकटात येतो.

अशीच एक घटना निपाणी तालुक्यातील कोगनोळी येथे घडली आहे.येथील ढोबळे पानंद सेसाप मळा या ठिकाणच्या जवळपास पंधरा एकर क्षेत्रातील हाता तोंडाला आलेलं उसाचं पिक क्षणात आग लागून उध्वस्त झालं.

सदर उसाला लागलेली आग गुलदस्त्यात असून शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. हे जळून खाक झालेलं उसाचं क्षेत्रफळ एका मालकीचे नसले तरी यामध्ये छोटे-मोठे सात ते आठ शेतकऱ्यांचे पीक होते.

रविवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान या ऊस पिकांना सेसाप मळ्यात आग लागल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली.थोडाफार उन्हाचा तडाका असल्याने उसाला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले होते.

सदर जळालेले ऊस पिकाचे क्षेत्र डॉ.अण्णासाहेब चौगुले,शरद चौगुले ,बाबासो चौगुले ,नितीन चौगुले यांच्यासह पाटील बंधू यासर्वांचे होते. मात्र अवघ्या तीन ते चार तासात जळून खाक झालेल्या उसामुळे बळीराजाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

त्यामुळे अगोदरच चिंतेत असलेल्या बळीराजाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही.सदर ऊसांची नोंदणी जवाहर साखर कारखाना हुपरी व छत्रपती शाहू साखर कारखाना कागल या ठिकाणी असुन उद्यापासून या क्षेत्राला तोड मिळणार असल्याची माहिती आहे. दिवाळीच्या सणा सुगीध्ये मध्ये या घडलेल्या प्रकारामुळे बळीराजाच्या डोळ्यात अश्रू मात्र नक्कीच असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here