अकोल्यातील दहशतवाद विरोधी पथकाने बाळापुर तालुक्यातील येत असलेल्या कलकत्ता ढाब्यावर सुरु असलेल्या अवैध दारू विक्री करणाऱ्या 2 जणांना ताब्यात घेतले आहे…
दहशतवाद विरोधी पथक अकोला यांना मिळालेल्या माहितीवरून राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कलकत्ता धाब्यावर अवैध रित्या देशी विदेशी दारूची विक्री केली जात आहे….
खबरीने दिलेल्या माहितीवरून छापा टाकला असता देशीदारु दारू 63 कवॉर्टर…किमंत 3276 रुपये व विदेशी दारू 8 बियर 1360 रुपये 8 मेकडोल विस्की 1200 रुपये असा एकूण 5836 रूपयांचा माल जप्त केला….
यात आरोपी अनिल देवीदास टेकडे व दुसरा मोहम्मद असलम मोहम्मद शकूर रा कलकत्ता ढाबा बाळापुर यांच्याविरुद्ध दारुबन्दी कायद्याच्या अन्तर्गत कार्यवाही करण्यात आली आहे…