मनोहर निकम, महाव्हाईस ब्युरो
अहमदनगर :येथील बहुचर्चित यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरण राज्यभर प्रचंड गाजले.३० नोव्हेंबर रोजी नगर-पुणे रोड वर रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती.
तेव्हा पोलिसांनी अवघ्या दोनच दिवसात मारेकऱ्यासह पाच आरोपींना जेरबंद केले होते. तपासात सुपारी देणारा मुख्य सूत्रधार म्हणून बाळ बोठे याचे नाव समोर आले होते.मात्र घटना घडल्यापासून बोठे फरार झाला.साडेतीन महिन्यापासून पोलिसांनी त्याच्या शोधार्थ जंगजंग पछाडले.विविध पोलीस पथके त्याचा शोध घेत होती.अखेरीस त्याला हैद्राबाद मधून अटक करण्यात पोलिसांना यश आले.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या पथकाने हि धडक कारवाई केली.साडेतीन महिन्यापासून फरार असणारा बोठे अखेर पोलिसांना कसा सापडला याबाबत सविस्तर माहिती पाटील देतील.पोलिसांना तो हैदराबादमध्ये असल्याची टीप मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी तिथे जाऊन छापा टाकत त्याच्या मुसक्या आवळल्या.अन अखेरीस या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याचा शोध थांबला.