पैगंबर मोहम्मद बिल आणि मुस्लिम आरक्षणासाठी रावेर येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन…

रावेर – उमाकांत मराठे

रावेर येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने पैगंबर मोहम्मद बिल व मुस्लिम आरक्षणासाठी रावेर नायब तहसीलदार श्री सी.के. पवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने आवाज उठवत आहे.

05 जुलै 2021 रोजी विधान भवनावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश जी आंबेडकर यांनी मोर्चा काढून न्यायालयाने मान्यता दिलेल्या 5% मुस्लिम शैक्षणिक आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी आणि वंचित बहुजन आघाडीने दिलेले पैगंबर मोहम्मद बिल पास करावे. या व इतर मागण्यांचे निवेदन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांन पर्यंत पोहोचविण्यात आले होते.

त्याचाच पुढचा टप्पा म्हणून मुस्लिम समाजाच्या संवैधानिक हक्क अधिकारासाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक वंचित बहुजन आघाडी ने दिलेली आहे. आज दि. 22 नोव्हेंबर 2021सोमवार रोजी रावेर रावेर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.आंदोलनातील मागण्या पुढील प्रमाणे आहे. 1) न्यायालयाने मान्यता दिलेल्या 5% मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे.

2) धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारे पैगंबर मोहम्मद बिल वंचित बहुजन आघाडी ने शासनाला सुपूर्द केले आहे ते बिल येणाऱ्या अधिवेशनात मंजूर करून तात्काळ तो कायदा लागू करावा. 3) महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या मिळकती मध्ये वाढ करून इमाम व मुअज्जीन आणि खुद्दाम हजारात यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे.

4) संत विचाराच्या प्रचारप्रसार करणाऱ्या ह.भ.पं.कीर्तनकार यांना शासना कडून मासिक वेतन सुरू करण्यात यावे 5) वक्फबोर्डाच्या जमिनीवर झालेले अवैद्य कब्जे हटवून त्या जागेवर अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा. 6) सारथी- बार्टी- महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी.

वरील मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्या अशा मागणीचे निवेदन रावेर नायब तहसीलदार सीके पवार यांना देण्यात आले. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, तालुका उपाध्यक्ष सलीम शहा, तालुका सचिव कंदरसिंग बारेला, तालुका उपाध्यक्ष सुरेश अटकाळे, तालुका सचिव राजेंद्र अवसरमल, तालुका उपाध्यक्ष विनोद तायडे, मोहम्मद शहा, सलमान शहा, कैलास वैद्यकर, शेख इम्रान, अजित शहा, दौलत अढांगळे, नितीन अवसरमल, वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here