प्रेम प्रकरणातूनच पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या बाघोली येथील घटना उघडकीस…

गोंदिया – अमरदिप बडगे

गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बाघोली येथील मुनेश्वर उर्फ मुन्ना सहसराम पारधी वय (32)वर्ष असे मृतकाचे नाव असुन त्यांच्या राहत्या घरी 21नोव्हेबरला रविवार पहाटे सुमारे 3:30वाजे सुमारास कुल्हाडीने वार करून ठार केल्याची दुदैवी घटना घडली होती.

याप्रकरणी मृतकाची पत्नी शारदा पारधी वय 28 वषे व शेजारच्या कृणाल पटले वय 21वषे इसमाला चौकशी करिता ताब् घेण्यात आले होते. सदर दोघांनी गुन्हा केल्याचे कबुल केले असुन सदर हत्या प्रेम प्रकरणातून करण्यात आल्याचे समोर आले आहे.सदर या अगोदर दोनदा मुनेश्वरला मारण्याचा प्रयत्न केला होता.पण तो असफल झाला असे देखील दोघांनी पोलीसांना तपास दरम्यान सांगितले .

मृतक मुनेश्वर पारधी गाढ झोपेत असताना पहाटेच्या सुमारास त्यांची पत्नी शारदा ने आपल्या प्रियकर कृणाल याला फोन करून घरी बोलावून अगोदरच आणलेल्या कुल्हाडीने कृणाल याने मुनेश्वरच्या डोक्यावर 3 सपासप वार करित हत्या करून पसार झाला. मुनेश्वरच्या पत्नीने खाली पडून डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितले.मात्र पोलिसांनी जेव्हा आपली तपास चक्र फिरविली त्यांनंतर कुठे सत्य बाहेर आले. शारदा व कृणाल विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांना 22 नोव्हेंबरला न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने दोन्ही आरोपींना 26नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक प्रताप भोसले दवनीवाडा करित होते.
परिसरात घटनेनं हळहळ व्यक्त होत असुन मुनेश्वरची तर हत्या झाली. परंतु त्यांच्या मागे 5 वर्षांची नीधी नावाची मुलगी असुन 3 वषाचा यश नावाचं मुलगा आहे . मात्र या दोघांचे आई-वडीलांविना छत्र जणु हरपले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here