बडनेरा रस्त्यालगत रपट्याची मागणी…

बडनेरा – मच्छिंद्र भटकर

बडनेरा येथील, रेल्वे स्टेशन ते विश्राम गृहा पर्यंत रस्ता रुंदिकरणाचे काम सुरू आहे, जमिन स्तरा पासून रस्त्यावर बांधकाम दोन फुट चे जवळपास असल्यामुळे या रस्त्यालगत असलेल्या नागरिकांना व शाळेच्या विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे,

रस्त्यालगत रपटे टाका या संदर्भात नागरिकांनी उपविभागीय अधिकार्यांना या संदर्भात निवेदन सुद्धा दिले, मात्र काही मोजक्याच ठीकाणी रपटे टाकले असून मुख्य ठीकानी मात्र रपटे टाकले, नाहीत, त्यामुळे नागरिकांना व वाहन धारकांना कमालिचा त्रास सहन करावा लागत आहे, तरी मनपा प्रशासन व संबधित विभागाचे या बाबत लक्ष घालून नागरिकांची समस्या सोडवावी अशी या परिसरातील जनतेची मागणी आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here