राज्यातील ‘या’ बँकेच्या ग्राहकांसाठी वाईट बातमी…खात्यातून 10 हजार रुपयांच्यावर पैसे काढण्यावर RBIने घातली बंदी

फोटो -सौजन्य गुगल

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकेच्या ग्राहकांसाठी पैसे काढण्याची मर्यादा निश्चित केली आहे. बँकेचे ग्राहक यापुढे त्यांच्या ठेवींमधून 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढू शकणार नाहीत. रिझर्व्ह बँकेने बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आता मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे ग्राहक त्यांच्या सर्व खात्यांमधून केवळ 10,000 रुपयेच काढू शकतील.

राज्यातील मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक स्थितीवर मध्यवर्ती बँकेने पैसे काढण्याच्या मर्यादेसह अनेक निर्बंध लादले आहेत. आता मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्यवर्ती बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कर्जाचे नूतनीकरण करणार नाही किंवा कोणतीही गुंतवणूक किंवा पेमेंट करणार नाही.

पुढील सहा महिने निर्बंध लागू राहतील

या सहकारी बँकेवर लादलेले हे निर्बंध येत्या सहा महिन्यांसाठी बुधवारी संध्याकाळपासून लागू होतील, असे केंद्रीय बँकेने म्हटले आहे. मात्र, हे निर्बंध लादले म्हणजे मलकापूर सहकारी बँकेला बँकिंग कामांपासून रोखले गेले, असे नाही, असे स्पष्ट केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, ही सहकारी बँक आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत काही निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करत राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here