दिल्ली येथील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू दिल्ली रवाना…

भाजप सरकारच्या कृषी विधेयका वरून हरियाणा आणि पंजाब येथील शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करत आहे. हे कृषीविधेयक शेतकऱ्यांना विश्‍वासात न घेता आणल्याने यात शेतकऱ्या ऐवजी उद्योगपतींना फायदा होणार असल्याची भीती शेतकर्‍यांना वाटत आहे.

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता महाराष्ट्रातही शेतकरी रस्त्यावर यायला लागलेला आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात दोन हजार शेतकरी मोटरसायकलने व चारचाकी वाहनाने जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून दिल्लीला रवाना झाले आहेत.मोझरी येथे प्रचार सभा सुरू असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 बराच वेळ जाम झाला होता.

हुकूमशाही करीत असलेलं केंद्र सरकार शेतकऱ्याच्या बाजूने उभं नसल्याने त्यांना धडा शिकविण्यासाठी आम्ही केंद्रात शेतकऱ्यांसोबत जात आहोत अमरावती मधून मध्यप्रदेश, आणि दिल्ली जातो आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कायदा करायचा असेल तर फक्त स्वामिनाथन आयोग लागू करा म्हणजे सगळ्यांना चांगले दिवस येतील असे राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here