बुलढाणा । डोंगरशेवली ग्रामपंचायत मध्ये जयंतीदिनी बाबासाहेबांना अभिवादन…

चिखली – राहुल गवई

तालुक्यातील मौजे ग्राम डोंगरशेवली येथे सोशल डिस्टंसिंग च्या सर्व नियमांचे पालन करत 14 एप्रिल दिनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले.यावेळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सरपंच स्वाती राजेंद्र इंगळे, उपसरपंच राहुल विष्णू गवई, ग्रामपंचायत सदस्य गजानंद सरकार, ग्रामपंचायत सचिव बी एन बोरकर , विजय सावळे ,पत्रकार संदीप सावळे,

मंगेश वानखडे, गौतम साळवे, छगन दांदडे, ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप सावळे सह कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत सोशल डिस्टंसिंग ठेवून एकेक करत गावातील प्रतिष्ठित ,समाजकारणी, राजकारणी मंडळींनी अभिवादन केले. तसेच भिम अनुयायी यांनी आपापल्या घरी बाबासाहेबांना अभिवादन करून जयंती दिनाचा आनंद साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here