“बाबा का ढाबा” ट्वीटर वर ट्रेंड सुरु आहे…काय आहे जाणून घ्या

न्यूज डेस्क – लहानपणी मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे आई वडील जेव्हा म्हातारे झाले कि ते मुलावर ओझे होतात मग त्यांना हीन वागणूक देवून अपमानित करतात अश्याच एका दिल्लीतील एका 80 वर्षीय जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोरोनाच्या संकटानं अनेकांना बेरोजगार केलं, तर काहींच्या उपजिविकेचं साधनं हिसकावलं. देशभरातील प्रत्येक राज्यात अशी उदाहरणं आहेत, ज्यांनी आर्थिक संकटाला कंटाळून आपलं जीवन संपवलं.

मात्र जगण्याची उमेद देणारी, पुन्हा मेहनतीनं उभी राहणारी फार कमी लोकं असतात. असंच दिल्लीतील एका 80 वर्षीय जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिल्लीतील मालविया नगर जवळ 80 वर्षीय दाम्पत्यांनी बाबा का ढाबा सुरू केला आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये ढाबा बंद होता, त्यामुळे या दाम्पत्याला दोन वेळचं अन्नही मिळत नव्हतं. मुलांनी मदत करण्यास नकार दिल्यानंतर वयाच्या 80व्या वर्षी हे जोडपं ढाबा चालवत आहे.

तर babakadhaba हा ट्रेंड tweeter वर सुरु आहे.यात अनेक लोकांनी या जोडप्याला आर्थिक मदतीचे आवाहन तर अनेकांनी तेथे भेट देवून त्यांच्यासोबतची फोटो सोशलवर शेयर करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here