रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत ऑटो चालकांचे मार्गदर्शन शिबिर व सत्कार संपन्न…

न्युज डेस्क – रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत दिनांक 18।1।21 ते 17।2।21 ह्या एक महिन्याचे काळात रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी तसेच अकोला शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी जनजागृतीचे वेगवेगळे कार्यक्रम शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला मार्फत राबविण्यात येणार आहेत,

त्याच अभियानाचा एक भाग म्हणून अकोल्यातील वाहतूक व्यवस्थे मध्ये एक महत्वाचा घटक असलेले ऑटो चालक ह्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक शिबिराचे आयोजन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी शहर वाहतूक शाखेच्या प्रांगणात आयोजित केले होते,

सदर शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम व पोलीस निरीक्षक गजानन शेळके हे प्रामुख्याने उपस्थित होते, मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले की आज अकोल्यात गरजेच्या कितीतरी जास्त ऑटो धावत आहेत त्या मुळे वाहतुकीच्या काही समस्या निर्माण झाल्या आहेत,

सर्व सामान्य नागरिकांच्या मनात ऑटो चालकां विषयी नकारात्मक प्रतिमा आहे त्याला अनेक कारणे आहेत, ही प्रतिमा सकारात्मक करायची असेल व अकोला शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व अपघात विरहित ठेवायची असेल तर ऑटो चालकांनी स्वयंशिस्त व वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे तसेच सर्व सामान्य नागरिकांना सौजण्याची वागणूक देणे आवश्यक आहे,

आज अकोला शहरात वाहनांच्या संख्येच्या तुलनेत आवश्यक मूलभूत सुविधा जसे पार्किंग व ऑटो थांबे नाहीत त्या मुळे वाहतूक व्यवस्था प्रभावित होते त्यातच ऑटो ची अमर्याद संख्या व त्या तुलनेत कमी प्रवासी ह्या मुळे प्रवासी मिळविण्याच्या स्पर्धेत वाहतुकीचे तीनतेरा वाजून ऑटो चालक तसेच वाहतूक पोलिसांची प्रतिमा मलिन होते ह्या साठी स्वयंशिस्त आवश्यक असल्याचे प्रतिपादन दोन्ही वक्त्यांनी केले।

प्रामाणिक ऑटो चालकांचा सत्कार – ह्या प्रसंगी ऑटो मध्ये महागडा मोबाईल व राहिलेले सामान परत करणारे ऑटो चालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। ऑटो चालक मोहम्मद जावेद मोहम्मद मूर्तजा रा खैरमोहम्मद प्लॉट ह्यांनी केशव नगर येथे राहणाऱ्या एका प्रवासी पुरुषाचा ऑटो मध्ये राहिलेला महागडा मोबाईल,

समान परत केल्याने तसेच ऑटो चालक सुभाष रामभाऊ चांदूरकर रा कुंभारी ह्यांनी १० दिवसा पूर्वी कृषी नगर येथे राहणाऱ्या एका पुरुषाचा ऑटो मध्ये राहिलेला मोबाईल व कागदपत्रे त्यांचा शोध घेऊन परत केल्याने त्यांचे प्रामाणिक पणा बद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम ह्यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला।

दर महिन्यात करण्यात येणार प्रामाणिक ऑटो चालकांचा सत्कार – ऑटो चालकांना चांगले व प्रामाणिक काम करण्यास प्रेरणा मिळावी म्हणून दरमहिन्यात चांगले व प्रामाणिक काम करणाऱ्या ऑटो चालकांचा माहितीची खात्री करून शहर वाहतूक कार्यालयात सत्कार करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी जाहीर करून नियम मोडणाऱ्या व गुंडगिरी करणाऱ्या ऑटो चालकांना वठणीवर आणण्यासाठी दंडात्मक व प्रसंगी पोलिसी हिसकाही दाखविण्यात येईल असेही त्यांनी सांगितले।

रस्ते सुरक्षा अभियानात वेगवेगळे जनजागृती, दंडात्मक मोहिमा व जनजागृती चे कार्यक्रम पोलीस अधीक्षक जी श्रीधर ,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत ह्यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here