ऑडी इंडियाकडून दक्षिण मुंबईमध्ये नवीन ऑडी अप्रूव्ह्ड: प्लस शोरूमचे उद्घाटन…

न्युज डेस्क – ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज दक्षिण मुंबईमध्ये त्यांचे नवीन पूर्व-मालकीचे लक्झरी कार शोरूम – ऑडी अप्रूव्ह्ड: प्लसच्या उद्घाटनाची घोषणा केली. ३००० चौरस फूटहून अधिक जागेवर पसरलेले हे अत्याधुनिक शोरूम कमला मिल्स कंपाऊंड, लोअर परेल येथे स्थित आहे आणि या शोरूममध्ये ६ कार्स प्रदर्शनार्थ दाखवण्याची क्षमता आहे.

ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “मुंबई आमच्यासाठी प्रमुख बाजारपेठ आहे आणि पूर्व-मालकीच्या लक्झरी कार्ससाठी मागणीमध्ये स्थिरगतीने वाढ होताना दिसण्यात आले आहे. हे आमचे मूळ शहर आहे आणि आज आम्‍हाला दक्षिण मुंबईतील कमला मिल्स येथे नवीन केंद्राचे उद्घाटन करताना अत्‍यंत आनंद होत आहे.

मला खात्री आहे की, हे नवीन शोरूम मुंबईतील पूर्व-मालकीच्या कार्ससाठी वाढत्या मागणीची पूर्तता करेल. मला सांगताना आनंद होत आहे की, आम्ही आसपासच्या भागांसोबत देशभरातील इतर शहरांमध्ये देखील अधिक सुविधांसह आमचे विस्तारीकरण सुरूच ठेवू.”

ऑडी अप्रूव्ह्ड: प्लस शोरूम्समधील प्रत्येक पूर्व-मालकीच्या कारची ३०० हून अधिक मल्टी-पॉइण्ट चेक्सवर प्रखर, बहुस्तरीय क्वॉलिटी तपासणी, मेकॅनिकल बॉडीवर्क, इंटीरिअर व इलेक्ट्रिकल तपासणी करण्यात येईल. कार खरेदी करताना ग्राहकांना परिपूर्ण ड्राइव्ह व समाधानाच्या खात्रीसाठी वाहनांची संपूर्ण ऑन-रोड चाचणी देखील घेण्यात आली आहे.

तसेच ऑडी अप्रूव्ह्ड: प्लस उपक्रमांतर्गत ऑडी इंडिया २४x७ रोडसाइड असिस्टण्स आणि खरेदीपूर्वी वाहनाची संपूर्ण माहिती देते. ग्राहक या उपक्रमाच्या माध्यमातून सुलभ फायनान्सिंग व विमा लाभ देखील घेऊ शकतात.

नवीनच उद्घाटन करण्यात आलेल्या शोरूमबाबत सांगताना ऑडी मुंबई साऊथचे अमित जैन म्हणाले, “आमचा ऑडी ब्रॅण्डसोबत दीर्घकाळापासून सहयोग राहिला आहे आणि आम्‍हाला कमला मिल्स येथील नवीन ऑडी अप्रूव्ह्ड: प्लस शोरूमसह हा सहयोग अधिक पुढे घेऊन जाण्याचा आनंद होत आहे.

आम्ही ग्राहकांचे स्वागत करण्यास आणि त्यांना उच्चस्तरीय ब्रॅण्ड अनुभव देण्यास उत्सुक आहोत.” ऑडी इंडिया रिटेलसंदर्भात त्यांचे विस्तारीकरण सुरूच ठेवेल. ब्रॅण्डचे सध्या भारतामध्ये चौदा प्री-ओन्ड कार शोरूम्स आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here