लाखांदूर तालुक्यात १२ रेतिघाटांचा होणार लिलाव,तीन वर्षासाठी होणार लिलाव,चूलबंद व वैनगंगा नदिघाटांचा समावेश…

लाखांदूर – नास्तिक लांडगे

सन 2020 ते 2023 या तीन वर्षासाठी लाखांदूर तालुक्यातील जवळपास 12 रेतिघाटांचा लिलाव होणार आहे.तसे येथील तालुका प्रशासनाने रेतिघाटांची नावे जिल्हा प्रशासनाकडे प्रस्तावित केली असुन त्यामध्ये चुलबंद व वैनगंगा या नदीवरील रेतिघाटांचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार गतवर्षी लाखांदूर तालुक्यात एकाही रेतिघाटाचा लिलाव करण्यात आला नव्हता.तर सन 2017-2018 व 2018-2019या वर्षात एकुण आठ रेतिघाटांचा लिलाव करण्यात आला होता.

त्यामध्ये लाखांदूर,गवराळा,दिघोरी/मोठी, नांदेड,धर्मापुरी,खोलमारा,इटान व आसोला या रेतिघाटांचा समावेश होता.मात्र सदर रेतिघाट लिलाव होउन रेतिचा उपसा व वाहतुक करुन तब्बल तीन वर्षे लोटूनही सबंधित रती घाटाच्या गावातील ग्रामपंचायतींना खनिकर्म विभागांतर्गत अद्याप अनुज्ञेय निधी प्राप्त झाली नसल्याची ओरड आहे.

सदर घटनेमुळे यावर्षी तालुक्यातील लिलाव केले जाणारे रेतीघाट देखील अडचणीत सापडण्याची शक्यता अनेकांनी वर्तविली आहे. दरम्यान यावर्षी लाखांदूर तालुक्यातील एकूण बारा रेतीघाट सन 2020 ते 2023 या कालावधीत लिलावासाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत.

प्रस्तावित करण्यात आलेल्या रेती घाटामध्ये चुलबंद नदीवरील दिघोरी मोठी आसोला लाखांदूर अंतरगाव खा मांढळ सोनी व भागडी या रेतीघाटांचा समावेश आहे तर वैनगंगा नदी काठावरील मोहरणा,नांदेड,गवराळा,विहिरगाव व खैरना आदींचा समावेश आहे.मात्र गत तीन वर्षापुर्वी प्रमाणे ग्रा.प.ना अनुज्ञेय निधी उपलब्ध न झाल्यास प्रस्तावित रेती घाटांचे लिलाव अडचणीत येण्याची शक्यता देखील अनेकांनी बोलून दाखवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here