शासन प्रशासनाच्या समन्वयाची ‘आमदार छावणी’ उपक्रम लवकरच…शेतकऱ्यांच्या समस्या जागेवच सोडवण्याचा प्रयत्न…आ.अमोल मिटकरी

अकोला – शासन प्रशासनाचा समनव्ययाने थेट शेतकऱ्यांपर्यत पोहचत शेतकऱ्यांच्या कृषी कर्ज,पीकविमा,बी बियाणे विषयक समस्या जागेवरच सोडवता याव्यात या उद्देशाने विधानपरिषदेचे सदस्य आमदार अमोल मिटकरी यांच्या अध्यक्षतेखाली

अकोला जिल्ह्यातील कुटासा गावामध्ये थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत जागेवरच शेतकऱ्यांच्या समस्यां सोडवण्यासाठी ‘आमदार छावणी’ उपक्रमाची सुरवात करण्यात आली असून यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या त्वरित सोडवण्यात आल्यात.


यावेळी जिल्हा उपनिबंधक डॉ प्रवीण लोखंडे, तहसीलदार राजेश गुरव, तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव देशमुख,सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजू पाटील, पोलीस पाटील गजानन उगले, सामाजिक वनीकरण वनक्षेत्रपाल एस जी कुरोडे,

महाराष्ट्र माजी ग्रामपंचायत सदस्य श्याम राऊत यांच्यासह वन विभाग, पोलीस प्रशासन, महसूल विभागासह विविध विभागाचे अधिकारी अधिकारी व शेतकरी उपस्थित होते…

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यां त्वरित सोडविण्यासाठी जिल्हाभरात आमदार छावणी हा उपक्रम सामाजीक अंतर राखत थेट शेतकऱ्यांपर्यत पोहचवत शासन प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे असे प्रतिपादन यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी केले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here