कोर्टाच्या आदेशाची अवहेलना करुन मालमत्तेचा ताबा घेण्याचा प्रयत्न, पुसद अर्बन बँकेच्या अध्यक्षासह तिघांविरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार…

अकोला – बँकेत तारण असलेल्या मालमत्तेचा बँकेने ताबा घेवू नये असा आदेश असतांना देखील बँकेचे अध्यक्ष आणि विशेष वसुली अधिकारी यांनी मालमत्तेचा बळजबरी ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार कर्जदाराकडून सिव्हील लाईन पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.

पुसद अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक पुसद या बँकेच्या नागपूर बुटीबोरी शाखेतून अकोला येथील प्रशांत मधुकरराव रायपुरे व अतुल मधुकरराव रायपुरे यांनी त्यांच्या भागीदारी फर्मसाठी मालमत्ता तारण देवून कर्ज घेतले आहे. सदर कर्ज थकीत झाल्यानंतर या कर्ज प्रकरणाच्या अनुषंगाने रायपुरे यांनी उच्च न्यायालयामध्ये प्रकरण दाखल केले आहे.

सदर कर्ज प्रकरणात तारण असलेल्या मालमत्तेचा बँकेने ताबा घेवू नये असा आदेश न्यायालयाने दिला आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना व मालमत्तेचा ताबा घेवू नये असा आदेश असतांनाही बँकेचे अध्यक्ष शरद आप्पाराव मर्इंद तसेच विशेष वसुली अधिकारी गजानन बापुराव पोळकट व आनंद धोटे यांनी अकोला येथे येवून रायपूरे यांच्या राऊतवाडी भागातील मधुनंदा अपार्टमेंट मधील त्यांच्या मालकीच्या फ्लॅट क्र. ३०१, ३०२, ३०३ व ४०३ अशा एवूâण ४ फ्लॅटचा काही लोकांना सोबत घेवून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.

याबाबतची माहिती होताच रायपूरे त्या ठिकाणी पोहोचले व या तिघांनाही गैरकृत्य थांबविण्याचे सांगितले. सदर स्थावर मालमत्तेवर मनाई हुकुम असतांना बँकेकडून ताबा घेण्याचा प्रयत्न करणाNया सदर लोकांनी रायपूरे यांना शिवीगाळ करीत जीवाने मारुन टाकण्याची धमकी देखील दिली. अशा संदर्भाची तक्रारी प्रशांत रायपुरे व अतुल रायपुरे यांनी सिव्हील लाईन पोलीस स्टेशन व अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिली आहे.

विशेष म्हणजे पुसद अर्बन बँकेकडून न्यायालयाचा अवमान करुन २४ जून रोजी तारण मालमत्तेच्या लिलावाची जाहिरात अकोल्यातील २ वर्तमान पत्रांमध्ये प्रकाशित केली होती. त्यानंतर सदर प्रकाशित जाहिरातीवर रायपूरे यांनी हरकत घेणारी जाहिरात त्याच वर्तमान पत्रांमध्ये प्रकाशित केली आहे.

तरी देखील बँकेच्या पदाधिकाNयांकडून सदर मालमत्ता काही लोकांना दाखविण्याचे गैरकृत्य करण्यात आले आहे. यासोबतच न्यायालयाचा आदेश मोडून मालमत्तेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे या तक्रारीत नमुद केले आहे. याबाबत बँकेकडे विचारणा केल्यावर प्रतिसाद मिळाला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here