अमरावतीमध्ये विवाहितेला पैशासाठी सासरी जीवे मारण्याचा प्रयत्न…सासरी मंडळींवर गुन्हा दाखल…

गुंजन मेश्राम- अमरावतीमध्ये एका विवाहितेला पैशासाठी त्यांच्या सासरी जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून गाडगेनगर पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर माहिती अशी आहे की दिपाली अमोल आठवले वय वर्षे 25 यांच्या फिर्यादीनुसार दिनांक 25 जानेवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी त्यांचे पती अमोल

आठवले त्यांचे देर सचिन आठवले सासरे भीमराव आठवले व सासू राजकन्या उर्फ देवकन्या आठवले यांनी महिलेला अक्षरशा त्यांच्या अंगावरील कपडे करून सर्वांनी हातात काठ्या घेऊन निर्दयीपणे गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

ही घटना घडल्यानंतर महिलेला तिच्या पतीचा मोबाईल घरात पडलेला दिसला असता त्वरित वेळ न घालवता तिने आपल्या माहेरी फोन करून सदर घटना सांगितली माहेरी फोन करतात महिलेच्या घरच्यांनी वेळ न घालवता गाव जवळ असल्यामुळे त्वरित सासरी येऊन महिलेला सांत्वना दिली व पोलिस स्टेशन गाठले सदर माहितीनुसार उपनिरीक्षक प्रदीप होडगे हे कलम 326 498-ए 354 323 504 506 व 34 नुसार तपास करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here