शहापूर येथे १०० टक्के लसीकरणावर भर देण्याचा प्रयत्न…

अमोल साबळे

शहापूर येथे ग्रामपंचायत भवनात कोरोना लसीकरणावर संपन्न झालेल्या बैठकीत शहापूर येथील गावा बद्दलचा आढावा यावेळी घेण्यात आला.यावेळी गावात लसीकरणावर भर देत गावात जनजागृती करण्यात आली. ज्या लोकांनी लस घेतली नाही त्यांच्या घरी जाऊन त्यांना योग्य ती माहिती देऊन लसीकरण करून घ्या व आपले आरोग्य उत्तम ठेवा असे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ. सविता प्रमोद कर्डेल, ग्रामसेवक राठोड मॅडम, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तलाठी तांबे साहेब, पोलीस पाटील प्रदीप तिळके, सरपंच पती प्रमोद कर्डेल, डॉ. पंकज शर्मा, यावेळी आशा स्वयंसेवीका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here