सुट्टीवर घरी आलेल्या जवानाकडून पत्नीची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न…

नाशिक – घरगुती नवरा बायोकाच्या भांडणातून वाद विकोपाला जावून लष्करी जवानाने पत्नीची निर्घृण हत्या करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे.

सुनील आणि चैत्राली असे पती पत्नीचे नाव असून दोघांत झालेल्या भांडणाच मोठ्या वादात झालं. रागाच्या भरात सुनीलने आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने स्वतःच्या हातावर चाकूने वार करत आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. आत्महत्येच्या प्रयत्नानंतर सुनीलचा जीव वाचला.

दरम्यान सुनील हा सातत्याने आपल्या मुलीला माहेरुन पैसे आणण्यासाठी छळत होता, अशी तक्रार मयत चैत्रालीच्या वडिलांनी पोलिसात दिली आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी सुनीलवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

दहा दिवसांच्या सुट्टीवर आलं असताना लष्करी जवानाने पत्नीची हत्या केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.लष्करात जवान असलेला सुनील बावा मूळ नाशिकचा रहिवासी आहे.

सुनील दहा दिवसांची सुट्टी घेऊन घरी आला होता. यावेळी सुनील आणि त्याची पत्नी चैत्राली बावा यांच्यामध्ये काही कारणांवरुन कुरबुरी सुरु झाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here