अफगाणिस्तानात शिया मशिदीवर हल्ला…32 जण ठार आणि 53 हून अधिक जखमी…

फोटो- सौजन्य टोलो न्यूज

न्यूज डेस्क – अफगाणिस्तानमधील कंधार येथील शिया मशिदीवर झालेल्या हल्ल्यात किमान 32 जण ठार झाले आहेत. या हल्ल्यात किमान 32 जणांचा मृत्यू झाला असून 53 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची माहिती स्थानिक एएफपी न्यूज एजेंसीने दिली आहे.

हा स्फोट शुक्रवारच्या नमाज दरम्यान झाला. अफगाणिस्तानची वृत्तसंस्था टोलो न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, कंधारच्या इमाम बर्गह मशिदीमध्ये सलग तीन स्फोट झाले आहेत. इमाम बरगाह मस्जिद कंधारमधील सर्वात मोठ्या मशिदींपैकी एक आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, स्फोट जोरात होता आणि हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढू शकतो. आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

अलीकडेच, 8 ऑक्टोबर रोजी शिया मशिदीवर झालेल्या हल्ल्यात किमान 100 लोक मारले गेले. हा स्फोट आत्मघाती हल्लेखोराने केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here