अचलपूरचे शहर शिवसेनाप्रमुख बुंदेले यांच्यावर प्राणघातक हल्ला !…प्रकृती चिंताजनक

न्यूज डेस्क – परतवाडा – अचलपूर शहर शिवसेनाप्रमुख पवन बुंदेले (४६) यांच्यावर आठ ते दहा जणांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्यात त्यांचे अन्य तीन सहकारी ही जखमी झाले. पवन यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे बुंदेले यांना अमरावतीला रेफर करण्यात आले, तर तिघांवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर पवन बुंदेले आपल्या सहकाऱ्यांसमवेत ८ ऑगस्टला दुपारी क्रिकेट खेळत होते. ४ वाजताच्या सुमारास पाच दुचाकींवर आलेल्या आरोपींनी पाईप, सळाखी आणि चायना चाकूने पवन बुंदेले यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. हल्ल्यात पवन बुंदेले यांच्यासह योगेश मनोहर जडिये (३५), चुलतभाऊ नितीन लक्ष्मण बुंदेले (४०), आणि वीरेंद्र सेंगर (२८) हे जखमी झाले.

जखमींना सर्वप्रथम उपचारार्थ अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले. तेथून गंभीर जखमी असलेले पवन बुंदेले यांना अमरावतीला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, नितीन बुंदेले यांनी फिर्याद नोंदविली. हल्लेखोरांपैकी एकाला सायंकाळी अचलपूर पोलिसांनी अटक केली.

पोलिसांना घटनेची माहिती समजताच अचलपूर परतवाडा मध्ये पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता सदर हल्ला हा शेतीच्या वादातून व पैशाच्या वादातून झाला असल्याचं बोललं जात आहे . याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली असून उर्वरित पसार झालेले आरोपींचा पोलिस शोध घेत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here