रेल्वे प्रवाशावर महिले कडून हल्ला….आठवडा भरातील दुसरी घटना…

फोटो - फाईल

कसारा /प्रफुल्ल शेवाळे,प्रतिनिधी

गेल्या आठवड्यात पुष्पक एक्सप्रेस मधील घटना ताजी असताना काल कसारा स्थानकात संध्याकाळी 7:30 च्या सुमारास पनवेल गोरखपूर एक्सप्रेस मध्ये एका रेल्वे प्रवाशावर ब्लेड ने वार झाल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे.

पनवेल गोरखपूर एक्सप्रेस कसारा स्थानकामधून 7:30च्या सुमारास रवाना झाली.. या एक्सप्रेस मध्ये गाणी म्हणून प्रवाशाकडून पैसे मागणारे महिला आणि त्यांचे साथीदार असतात. ते नियमित पण गाणी म्हणून पैसे मागताना दिसत असतात.

आज अशाच एका महिलेने गाणं म्हणून झाल्यावर एका प्रवाशाकडे पैसे मागितले.. प्रवासी पुरुष व्यक्ती ने पैसे देण्यास नकार दिला.. याचाच राग येऊन महिलेने सदर प्रवाशावर ब्लेड ने हल्ला केला अशी माहिती रेल्वे प्रवाश्याकडून हाती येतं आहे.सदर एक्प्रेस कसारा स्थानकातून रवाना झाल्यावर घडली आहे…

सदर च्या हल्ल्या ने एकच खळबळ उडाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.सदरच्या घटनेची प्राथमिक माहिती कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवाशी संघटना सदस्य आकाश डोळस यांच्या कडून प्राप्त झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here