ATM व्यवहाराचा नियम १ जानेवारीपासून बदलणार…RBI ने बदलला नियम…

न्युज डेस्क – भारतात आता ATM बाबतच्या नियमाबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी Contact less Cards कार्ड्स ची पेमेंट मर्यादा २००० रुपयांवरून वाढवून ५००० रुपये केली आहे. १ जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे.

या तंत्रज्ञानाच्या मदतीने कार्ड होल्डरला एखाद्या ठिकाणी पैसे भरतांना स्वाइप करण्याची आवश्यकता नसते. पॉइंट ऑफ सेल (POS) मशीनच्या जवळ कार्ड नेल्यास पेमेंट होऊ शकते. कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्डमध्ये दोन प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जातात – ‘नियर फील्ड कम्युनिकेशन’ आणि ‘रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटिफिकेशन’ (आरएफआयडी). जेव्हा या तंत्रज्ञानासह सुसज्ज जर कार्ड मशीनच्या २ ते ५ सेंटीमीटरच्या रेंजमध्ये असेल तरच पैसे भरता येऊ शकतात.

यासाठी मशीनमध्ये कार्ड इनसर्ट करण्याची किंवा ते स्वाइप करण्याची आवश्यकता नाही. या प्रणालीमध्ये पिनची देखील आवश्यक नाही. कॉन्टॅक्टलेस देयकासाठी कमाल मर्यादा २००० रुपये होती. ती वाढवून आता ५ हजार करण्यात आली आहे.

कोरोना काळात अशाप्रकारे मर्यादा वाढवल्यामुळे ग्राहकांना फायदाच होणार आहे. अशाप्रकारे एका दिवसात एकूण पाच संपर्कविहीन व्यवहार करता येतात. या रकमेपेक्षा जास्त देय देण्यासाठी, पिन किंवा ओटीपी आवश्यक आहे.

याशिवाय रिअल टाइन ग्रॉस सेटलमेंट (RTGS) सेवा देखील २४x७x३६५ उपलब्ध करण्यास त्यांनी सांगितले आहे. पुढील आठवड्यापासून ही सेवा लागू करण्याचे सांगितले आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही आता RTGS च्या माध्यमातून 24 तास पैसे ट्रान्सफर करू शकता. सध्या ही सेवा केवळ महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार सोडल्यास आठवड्यातील सर्व कामकाजाच्या दिवसात सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here