पातुर तालुक्यातील सावरखेड येथे ढगफुटीने शेतकऱ्यांच्या शेती गेली खरडुन…

पातुर तालुका प्रतिनिधी – पातुर तालुक्यातील सावरखेड येथे काल सांयकाळी ५ वाजताच्या दरम्यान काळे ढग जमा झाले.या काळ्या ढगामुळे या परीसरात काळोख पसरला होता अचानक या परीसरात एकदम मुसळधार पावासाची सुरुवात झाली

पाऊस एवढा धो धो होता की गावकर्याना काहीच सुचत नव्हत अचानक गावालगतच्या नाल्लाला महापुर आला या भागातील अंदाजे चाळीस एकर शेती काही क्षणात घरडुन गेले

हा पाऊस सतत एक तास चालु असल्याने नाल्या काठच्या बगायती जमीन खरडुन गेल्या शेता मधील सिचंनाच्या साहीत्या कम्पाऊड , फळबाग , सोयाबीन तुर अद्रक चे पिके सर्व खरडुन गेल्याने शेतकरी हताश झाले .

या आचानक ढगफुटीमुळे शेतकरी हवालदील झाले आहेत घटना स्थळी कृषी विभाग , महसुल विभागाचे कर्मचाऱ्यांनी पंचनामा करणे सुरु केले .या नुकसानीची भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here