सावरगाव येथे सचिवा ने केला गावाचा कायापालट…

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यातील अखेर चे गाव असलेले ग्राम सावरगाव येथे अनेक वर्षा पासून सुविधा चा अभाव पडलेला होता मात्र ज्या दिवस पासून ग्रामसेवक शिवकुमार सर्जे यांनी पदभार हाताशी घेतला त्या दिवस पासून सावरगाव या गावाचा कायापालट होण्यास सुरुवात झाली असून कर्तव्यदक्ष ग्रामसेवक शिवकुमार सर्जे यांनी गावात शासनाने दिलेल्या निधी मधून स्मशानभूमी ला गेट, तार कंपाउंड,

पेव्हर ब्लॉक बसविले असून दलित वस्ती मध्ये अंदाजे 25 लाख रुपयाची महत्वाचे कामे केली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ पेव्हर बसविणे,लहान मुलांसाठी असलेल्या अंगणवाडीत विविध कामे करून बोलकी अंगणवाडी केली तसेच तांडावस्ती येथे समाजगृह पूर्णतः स नेले असून तसेच गावातील नाल्या, रस्ते आदी. कामे करून आपल्या कर्तव्यदक्षते दाखवून ग्रामवासीया चे मने जिंकली असून ग्रामसेवक शिवकुमार सर्जे व सरपंच बलक यांनी गावात सामाजिक सलोखा कसे राहील,

तथा गावाचा विकास कसा होईल याचे सुद्धा भान ठेऊन अल्पवधीत सावरगाव येथे अंदाजे पन्नास लाख रुपयाचे विकास कामे या जोडगोळी ने केले असून त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक ग्रामवासी करीत असून ग्रामसेवक शिवकुमार सर्जे यांनी गावात शासनाने दिलेल्या विविध योजना चि माहिती नागरिकांना वेळोवेळी देत राहत असून ते नेहमी सावरगाव येथे आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी हजर राहत असल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदी वातावरण आहे.

विशेष म्हणजे ग्रामसेवक शिवकुमार सर्जे व सरपंच बलक यांनी मागील अडीच वर्षाच्या कालावधीत केलेल्या विकास कामाबाबतीत सावरगाव वासियांनि दोघाना वेळोवेळी प्रोत्साहन दिले असून ग्रामवासियांनि कधीच कुठलीही साधी तक्रार सरपंच / सचिव यांच्या विरुद्ध केली नसल्या चे ग्रामवासीया चे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here