बोरी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने अस्वलाचा मृत्यू…

अमरावती – प्रज्योत पहाडे

मेळघाट मधील चिखलदरा जाताना बोरी गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने अस्वलाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरातील लोकांनी ते पाहण्यासाठी गर्दी केली होती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा सीमा येथून जवळच असलेल्या परिसरामध्ये वन्य श्वापदांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे व चिखलदरा घटक मार्गे रस्त्यावर वाहनांची जास्त वर्दळ असते रात्रीच्यावेळी अस्वल रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने अस्वलाचा जागीच मृत्यू झाला आहे.

गावातील लोकांनी या ठिकाणी अस्वलाला पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे वनविभागाला माहिती दिल्यावर त्वरित वनविभागाचे पथक तेथून त्यांनी पंचनामा केला व शवविच्छेदन करण्याकरिता आमजरी नर्सरीत देण्यात आले आहे. त्या ठिकाणी वनविभागाने अस्वलीवर अंतिम संस्कार देखील केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here