सावनेर पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्याला ५००० हजारांची लाच घेतांना अटक…

नागपूर – शरद नागदेवे

कर्मचाऱ्याची बदली झाल्यानंतर त्याला बदलीची नोटशीट मागण्यासाठी कर्मचाऱ्यानेल सावनेर पंचायत समितीचे साहाय्यक प्रशासकीय अधिकारी योगेश संगेवार यांच्यकडे अर्ज देऊन बदललीची नोटशीट मागीतली होती. या कामासाठी संगेवार यांनी ५००० हजार रुपयांची मागणी केली होती.

कर्मचाऱ्याला लाच देण्याची इच्छा नसल्याचे संगेवारची तक्रार कर्मचाऱ्यानी एसीबीच्या नागपूर कार्यालयात केली.पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप जाधव यांनी आधी या तक्रारीची चौकशी केली.चौकशी दरम्यान आरोपीची सत्यता माहिती केल्यानंतर हेड कॉन्स्टेबल प्रवीण पडोळे,पंकज घोडके,लक्ष्मण परतेकी,सदानंद सिरसाठ,

या सर्वांचे मीळुन एक पथक तयार मंगळवारी दुपारी ३ वाजता पंचायत समिती सावनेर येथे सापळा रचून आरोपी योगेश संगेवार याला ५००० हजारांची लाच घेतांना रंगेहाथ अटक करून आरोपीवर गुन्हा दाखल केला.ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद तोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप जगताप,प्रवीण पडोळे,लक्ष्मण परतेकी,पंकज घोडके,चालक संदानंद सीरसाट यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here