विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण…

न्यूज डेस्क – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना करोनाची लागण झाली नाना पटोले यांनी स्वत: याबाबत ट्वीटर माहिती दिली आहे. करोनाची लक्षणं जाणवू लागल्यामुळे मी माझी करोना चाचणी केली असून त्याचे अहवाल सकारात्मक आले आहेत,अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. तसंच गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनी करोना चाचणी करून घ्यावी असंही ते म्हणाले.

“गेले अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली. ती चाचणी सकारात्मक आली आहे. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये,” असं नाना पटोले म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here