विधानसभा अध्यक्षांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी…

डोंग्यावर बसून भरपुरात केली गावाची पाहणी.
पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याच्या प्रशासनाला सुचना.

लाखांदूर – नास्तिक लांडगे

वैनगंगा नदीला गोसे धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने पूर येऊन नदीकाठावरील अनेक गावात पुराचे पाणी शिरले आहे. या घटनेची माहिती साकोली चे आमदार तथा राज्य विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना होताच 30 ऑगष्ट रोजी दु.12वाजताचे दरम्यान लाखांदूर तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेट दिली.

या भेटीत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गावात आलेल्या पुराच्या पाण्यात डोंग्यावर बसून आपातग्रस्त गावकर यांच्या व्यथा जाणून घेत पुराने बाधित कुटुंबांना व शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून शासन मदत पोहोचविण्याच्या सूचना तालुका प्रशासनाला दिल्या आहेत.

चूलबंद व वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे लाखांदूर तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील धान शेती व घरांचे नुकसान झाले आहे. वैनगंगेला पूर येऊन नदीकाठावरील खैरना, मोहरणा, गवराळा,डांभविरली,टेंभरी,विहिरगाव,खैरी/पट,विरली(खु.),इटान,नांदेड आदी गावात पुराचे पाणी शिरल्याने अनेक कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. तर चूलबंद नदीच्या पुरामुळे नदीकाठावरील सर्वच गावातील धान शेतीसह अन्य पिकांची मोठी हानी झाली आहे.

दरम्यान 30 ऑगस्ट रोजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी तालुक्यातील खैरना व मोहरणा या गावात जाऊन चक्क गावात आलेल्या पुराच्या पाण्यात डोंगरावर बसून गावाची पाहणी करत बाधित कुटुंबांना व शेतकऱ्यांना पंचनामे करून तात्काळ शासन मदत देण्याच्या सूचना तालुका व जिल्हा प्रशासनाला केले आहेत.

या पाहणी दरम्यान लाखांदूर चे नायब तहसीलदार देविदास पाथोडे, ठाणेदार शिवाजी कदम, गटनेता रामचंद्र राऊत, मेहबूब पठाण, फिरोज छ्वारे, तलाठी मेश्राम यासह अन्य अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here