नवी मुंबईतील भाजप नगरसेविकेवर प्राणघातक हल्ला!…

न्यूज डेस्क – नवी मुंबईत कौपरखैरणे येथील भाजप नगरसेविका संगीता म्हात्रे व त्यांच्या पतीवर प्राणघातक हल्ला झाला असून नगरसेविकेचे पतीवर थोडक्यात बचावले आहे. वाशीच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

कोपरखैरणे सेक्टर 6 मधील कार्यालयात भाजपा नगरसेविका यांचे कार्यालय आहे. संगिता म्हात्रे यांचे पती संदीप म्हात्रे यांच्यावर मारेकर्यांनी प्राणघातक हल्ला करून पळून गेले. यावेळी रि्व्हॉल्वर आणि कोयत्यानं आरोपींनी हल्ला केल्याची माहिती.

दोन अज्ञात आरोपी संगिता म्हात्रे यांच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात संदीप म्हात्रे यांच्या खांद्यावर कोयत्याचे वार करण्यात आले. आरोपींकडून हल्ला होताच दोघांनीही आरडाओरड केली. तेव्हा आरोपींनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांना एका आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. तर दुसरा आरोपी पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या हल्ल्यात जखमी झालेले संदीप म्हात्रे यांच्यावर नवी मुंबई पालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट असून कौपरखैरणे पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here