माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी- अशोकराव चव्हाण
महेंद्र गायकवाड
नांदेड सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण कोरोनाची लागण झाली आहे. मंत्रीमंडळ बैठक सुरू असताना कोरोनाचा अहवाल आला. कोरोनाचा अहवाल येताच मंत्रीमंडळ बैठकीतून 10 मिनिटांत अशोक चव्हण बाहेर पडले. सकाळी कॉंग्रेस बैठकीला अशोक चव्हाण उपस्थित होते.माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी असे आवाहन स्वतः अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.
आगामी निवडणुकांकरता सर्वच पक्षांनी आता कंबर कसायला सुरुवात केली आहे. स्वबळाचे नारे दिल्यावर निवडणुकीतील समिकरणं, डावपेच ठरवण्याकरता महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी एच.के पाटील दोन दिवसांच्या मुंबई दौ-यावर आहेत. आज बैठकांचा पहिला दिवस होता. या वेळी अशोक चव्हाण उपस्थित होते. अशोक चव्हाणांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.