विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने त्यांचे संरक्षण गरजेचे…जि.प.शिक्षणसभापती बेळगे…

महेंद्र गायकवाड
नांदेड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विध्यार्थ्यांची सुरक्षा महत्वाची असून त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे आहे .त्यामुळे विद्यार्थी संख्या ज्यादा असलेल्या शाळा सुरू करू नये असे मत जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत व्यक्त केले.


जिल्हा परिषदेत शिक्षण समितीची बैठक दिनांक 23 जून रोजी घेण्यात आली.या बैठकीला माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब कुंडगिर,प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्यासह जिल्ह्यातील पंचायत समितीचे सर्व गटशिक्षणाधिकारी व दोन्ही विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.


बैठकीला मार्गदर्शन करताना संजय बेळगे म्हणाले,की कोरोनाचे प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या भागातील शाळा सुरू करण्यात येऊ नयेत.तसेच ज्यादा विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा सुरू करू नयेत. शाळा सुरू करण्यापूर्वी दोन्ही शिक्षणाधिकारी यांनी तालुकानिहाय दौरा करावा,जेणेकरून शाररीक दुरी राखूण शाळा सुरू करता येतात का,तसे असेल तर शाळा सॅनिटायझर करून निर्णय घ्यावा,

त्यासाठी त्या-त्या गावातील शाळेवर असलेल्या शिक्षकाना गावी राहणे बंधनकारक ठरणार आहे, अशा सूचना बेळगे यांनी दिल्या. या झालेल्या बैठकीत शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना 27 जून पर्यंत अद्यावत माहिती भरून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या बैठीकला गटशिक्षणाधिकारी आडे,विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी,शिंदे,इंगळे,मेकाले,जाधव,निझाम,भारती,आमदूरकर आदींची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here