शरद नागदेवे
नागपूर -सोनेगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्या झालेल्या कुख्यात गुंड खामला येथील रहिवासी निलेश राजेश नायडु(३१) याच्यावर यापूर्वी लुटमार,खून,खूनाचा प्रयत्न आदी स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.तो शुक्रवारी नुकताच जामीणवर सुटून आला होता.
निलेश सोमवारी आरोपी मयूरच्या दुकानात गेला होता.त्याचा मीत्र गोलू मारीया आणि इतर मीत्रांची जमानत का होऊ दीली नाही अशी विचारणा केली. मयुर ला धमकावले व मारहाण केली.नीलेश सोमवारी सायंकाळी ६ वाजता दरम्यान आपला मीत्र प्रतीक साहारे सोबत खामला जयताळाकडे जाणाऱ्या लंडन स्ट्रीट परिसराचा मैदानावर दारु पीत होता.
तेव्हा मयूर आणि त्याचा मीत्रांनी त्यांचावर हमला केला.निलेश आणि प्रतीकला घेरून रॉड आणि तीक्ष्ण औजाराने दोघालाही मारहाण केली.प्रतीकच्या पायावर वार करून त्याला लंगडा करण्यात आले.प्रतीक घटनास्थळावरून आपला जिव वाचवून लंगडत कसातरी रस्त्यावर पळाला.नतंर आरोपी निलेश वर तुटून पडले व त्याला जागीच ठार मारून फरार झाले.माहिती मीळताच सोनेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
अधिकाऱ्यांनी घटनेचा तपशील घेतला.पंचनामा करून निलेश चे मुत्यूदेह मेडीकल रूग्णालयात पाठवले.पोलीसांनी तात्काळ आरोपिंचा शोध घेऊन पोलीसांनी ३ आरोपिंना अटक केली.अटक केलेल्या आरोपिंन मध्ये मयूर शेरेकर,गोविंद डोंगरे, आणि सागर बग्गाचा समावेश आहे.चौथा आरोपी विशाल फरार आहे.पोलीस त्याचा शोध घेत आहेत