आर्यन खानच्या जामिनासाठी वकिलाची उच्च न्यायालयात धाव…

फोटो- सौजन्य twitter

न्यूज डेस्क – शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एनडीपीएस न्यायालयाने जामीन अपील फेटाळल्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी आर्यनचे वकील आज उच्च न्यायालयात पोहोचले होते.

एनसीबी एएसजी अनिल सिंग यांनी सांगितले की, खान यांच्या वकिलांनी त्यांना याबाबत माहिती दिली होती. वकील सतीश मानशिंदे आणि अमित देसाई आज याचिकेचा उल्लेख करण्यासाठी न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या खंडपीठासमोर हजर झाले होते, परंतु ते स्वीकारले गेले नाही. त्यानंतर आता उद्या म्हणजे गुरुवारी सुमारे साडेदहा वाजता त्याचा उल्लेख केला जाईल.

समीर वानखेडे म्हणाले – सत्यमेव जयते

अहवालांनुसार, न्यायालयातून बाहेर पडताना आर्यनच्या वकिलांनी म्हटले होते की अर्ज कोणत्या आधारावर फेटाळला गेला हे देखील त्यांना माहित नाही. उच्च न्यायालयात जाण्यापूर्वी त्यांना आधी न्यायालयाचा आदेश वाचावा लागतो. त्याचवेळी, असेही वृत्त आहे की अर्ज फेटाळल्यानंतर NCB अधिकारी समीर वानखेडे यांनी माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, फक्त ‘सत्यमेव जयते’ असे दोन शब्द सांगितले.

दिवाळीपर्यंत प्रकरण ओढण्याची भीती

दिवाळीमुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात न्यायालयीन सुट्ट्या असतील. अशा परिस्थितीत जर आर्यन खानला लवकरात लवकर जामीन मिळाला नाही तर दिवाळी सुद्धा तुरुंगातच काढावी लागेल. त्याचा दसरा तुरुंगात गेला आहे.

एका अभिनेत्रीचे नावही आले

आर्यन खान सोबत ड्रग्स सापडली नाहीत. एनसीबीने त्याचा मित्र अरबाज मर्चंटकडून ड्रग्स जप्त केली होती. त्याच वेळी, एनसीबीने आर्यनच्या व्हॉट्सअप चॅट्सचा न्यायालयात हवाला दिला आहे. एनसीबीला संशय आहे की आर्यन आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकिंग टोळीशी संबंधित आहे. त्याचबरोबर, NCB ने एक पदार्पण करणारी अभिनेत्री आणि आर्यन यांच्यात ड्रग्स संदर्भात न्यायालयात chat बाब देखील ठेवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here