आर्यन खानची आजच होणार सुटका…पहाटेच उघडली जेलची बेल बॉक्स

फोटो- सौजन्य ani

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला जामीन मिळूनही मुदतीत कागदपत्रे तुरुंग प्रशासनाकडून न मिळाल्याने ड्रग्ज प्रकरणी मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आणखी एक रात्र काढावी लागली. मात्र, आता काही वेळात आर्यन खान तुरुंगातून बाहेर येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. न्यायालयाचा आदेश प्राप्त करण्यासाठी आर्थर रोड कारागृहातील बेल बॉक्स आज पहाटे 5.30 वाजता उघडण्यात आला. आता तुरुंगातील औपचारिकता पूर्ण करून आर्यन खानची सुटका होण्याची शक्यता आहे.

आर्थर रोड कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटे 5.30 वाजता कारागृहातील जामीन पेटी उघडली. त्यात काल आर्यन खानच्या बेलची प्रत ठेवण्यात आली होती. तुरुंगातील औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर आर्यनची लवकरच सुटका होणार असल्याचे मानले जात आहे.

आर्यनच्या आजच्या रिलीजच्या पार्श्वभूमीवर शाहरुख खानचे घर मन्नत पूर्णपणे सजवण्यात आले आहे. शाहरुख खानचे चाहते कालपासून तिथे आर्यन खानची वाट पाहत आहेत.

क्रूझ शिपवर ड्रग्ज मिळण्याच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर 25 दिवसांनी हायकोर्टाने गुरुवारी आर्यनला जामीन मंजूर केला होता. शुक्रवारी संध्याकाळी विशेष न्यायालयाने आर्यनला रिलीझ मेमो जारी केला, परंतु त्याच्या वकिलांना निर्धारित वेळेत कागदपत्रे तुरुंग अधिकाऱ्यांना पोहोचवता आली नाहीत. त्यामुळे आर्यनला आणखी एक रात्र तुरुंगात काढावी लागली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here