तब्बल २७ दिवसांनी तुरुंगातून आर्यन खानची सुटका…’मन्नत’ वर जंगी स्वागत…पाहा Video

फोटो- सौजन्य ani

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात बंद असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची आज सकाळी 11 वाजता तुरुंगातून सुटका करण्यात आली. तुरुंग प्रशासनाने ही माहिती दिली आहे. अभिनेत्री जुही चावलाने शुक्रवारी 23 वर्षीय आर्यनसाठी बाँड भरला. मात्र, सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आर्थर रोड कारागृहात सुटका आदेश पोहोचू शकला नाही, त्यामुळे आर्यन तुरुंगातून बाहेर येऊ शकला नाही.

आज आर्यन खान आर्थर रोड जेलच्या बाहेर आला तेव्हा गेटवर खूप गर्दी होती. कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

आर्यन खान मुंबई हायकोर्टातून जामिनावर तुरुंगातून बाहेर आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर मास्क होता. आर्यन तिथे कोणाशीही न बोलता गेटवर उभ्या असलेल्या काळ्या एसयूव्हीमध्ये बसला आणि तेथून मन्नत वर पोहचला तेथे त्याचे फटक्यांची आतिषबाजी करून जंगी स्वागत करण्यात आले आहे.

आर्यन खान व्यतिरिक्त या प्रकरणातील सहआरोपी मुनमुन धमिचा आणि अरबाज मर्चंट यांचाही जामीन न्यायालयाने स्वीकारला होता. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) या तिघांना 2 ऑक्टोबर रोजी क्रूझवर आयोजित केलेल्या ड्रग पार्टीदरम्यान ताब्यात घेतले होते आणि 3 ऑक्टोबर रोजी औपचारिकपणे अटक केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here