राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर कला व साहित्य क्षेत्रातील वंचित कलावंतांच्या हक्कासाठी काम करण्याला व्यक्तीला संधी देण्याची मागणी…

प्रशांत मानकर प्रदेश सरचिटणीस चित्रपट व सांस्कृतिक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई- महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपाल कोट्यातून 12 सदस्यांची नियुक्ती करावयाची असल्याने राज्य मंत्रिमंडळात शिफारस केलेल्या नावाची राज्यपाल विधान परिषदेवर सदस्य म्हणून करत असतात. सध्या सत्तेत असलेल्या शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षाचे 12 सदस्य राज्यपाल कोट्यातून विधानपरिषद जायचे आहेत.

महाविकास आघाडी कडून तिन्ही पक्षाचे प्रत्येकी 4 जणांची निवड विधानपरिषद होऊ शकते, दरम्यान नुकताच करोना या महामारी प्रादुर्भावामुळे अनेक कलावंत गेल्या तीन महिन्यापासून मोठ्या अडचणीला समोर गेले आहेत अशातच त्यांचा रोजगार बुडाला असून पुढच्या दोन वर्षाचा त्यांचं आर्थिक नियोजन करण्याचा त्यांचा महत्वाचा सिझन हातून निघून गेला आहे.

त्यामुळे येत्या काळात साहित्य, चित्रपटात, नाट्यक्षेत्र, असेल किंवा कलाक्षेत्र यामध्ये काम करण्याऱ्या अनेक कलावंतांना येत्या काळात मोठ्या संकटाला सामोरं जायचं आहे.अशावेळी या कलावंतची बाजू प्रभावीपणे विधान परिषदेत मांडण्याकरिता व त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणातला आर्थिक पॅकेजची मागणी असो किंवा शूटिंगच्या मानधनाचा विषय असो, शूटिंग दिवसातील दहा तास होईल

याविषयी, रात्री-अपरात्री शूटिंग संपल्यास महिला कलाकारांना घरापर्यंत सोडवण्याची जबाबदारी असो, ज्येष्ठ कलाकारांच्या पेन्शन वाढ संदर्भात पेन्शन पंधरा हजार, बारा हजार, दहा हजार याविषयीचा मुद्दा असो, शूटिंगच्या वेळी दिले जाणारे अन्नाची गुणवत्ता उत्तम असावी,त्यांच्या

भविष्याच्या नियोजनाचा विषय असेल त्यांचे आर्थिक प्रश्न,आरोग्यचे प्रश्न,घरकुळाचे प्रश्न असतील अशा अनेक विषयांना घेऊन योग्य रीतीने आणि प्रभावीपणे शासन दरबारी आपले म्हणणे मांडण्यासाठी कलावंताच्या बाजूने बोलण्यासाठी अशाच व्यक्तीची या परिषदेवर निवड केली गेली तर खऱ्या अर्थाने या कलावंतांना न्याय मिळेल अशी भावना आहे.

विधान परिषद सभासद याकरिता राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने चित्रपट कला व सांस्कृतिक विभागाच्यावतीने कार्याध्यक्ष बाबा पाटील व चित्रपट निर्माते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भ विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष माजी आमदार कलावंत प्रा.श्री तुकाराम बिडकर यांच्या नावाचाही पक्षाच्यावतीने विचार करावा अशी मागणी पक्षाकडे करणार आहेत अशी माहिती प्रशांत मानकर प्रदेश सरचिटणीस चित्रपट व सांस्कृतिक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here