पारध्यांचे घर जळणाऱ्या समाजकंटकांना अटक करा, प्रशांत केदार यांची जिल्हा – पोलीसप्रमुख यांच्याकडे मागणी…

सांगली – ज्योती मोरे

तासगांव तालुक्यातील सावर्डे गावातील गायरानमध्ये राहणाऱ्या गरीब पासेपारधी तमीना जगनू पवार यांचे घर जळणाऱ्या अज्ञात समाज कंटकांना तात्काळ अटक करण्याची मागणी सामजिक कार्यकर्ते प्रशांत केदार यांनी जिल्हापोलिस प्रमुख व जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेनात म्हंटले आहे…लोकशाहीत सर्वांना जगण्याच्या समान अधिकार आहे.पासेपारधी हे अत्यंत गरीब बहुजन मागास समाज आहे.आजही हा समाज अनेक पायाभूत सोयीसुविधा व मूलभूत हक्कापासून वंचीत आहे. केवळ पारधी समाजाचे कुटुंब आहे.ते चोऱ्या करतात.या संकुचित व विकृत मनोवृत्तीतुन त्यांची घरे जळण्याचे कृत्य घडले आहे.ही गोष्ट लोकशाहीला काळिमा फासणारी आहे.

तमीना जगनू पवार यांचे घर जळणारे अज्ञात समाजकंटक हे भविष्यात इतरांच्या घराला आग लावतील. पासेपारधी समाज हा अपराधी,गुन्हेगारी समाज आहे.या दृष्टिकोनातून समाज कंटकांनी हे कृत्य केले आहे.सावर्डे गावाने शासनाच्या विविध उपक्रमात भाग घेत गावचे नाव नावारूपास आणले होते. परंतु या अमानवी कृत्यामुळे गावातील मानवीय सलोखा,शांतता नष्ट करीत कायदा-सुव्यस्थेला बाधा पोहचवली जात आहे.

तेंव्हा आज एकविसाव्या शतकातही माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणाऱ्या त्या अज्ञात समाजकंटकाना पोलीस प्रशासनाने तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करावी.अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here