देवर्डा येथील भ्याड हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करा…जिल्हा काॅंग्रेस अनुसूचित जाती विभागाची जिल्हाधीकारी यांच्याकडे तक्रार

अकोला । प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील दहिहांडा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देवर्डा या गावातील काही समाजविघाटक वृत्तीच्या लोकांनी समुहाने एकत्रीत येऊन आंतरजातीय प्रेम प्रकरणातून बौद्ध समाजाच्या युवकाने कोळी समाजाच्या मुलीशी विवाह केल्याच्या द्वेशातुन २० जुन २०२० रोजी भ्याड हल्ला केला होता.

यामधे शेषराव आठवले हे गंभीर जखमी झाले असुन त्यांच्या पत्नी सौ. लता आठवले व मुले विकास व सुहास हे सुद्धा जखमी झाले आहेत. तसेच या प्रकरणात अद्यापपर्यंत स्थानिक पोलिस स्टेशनने चौकशी केलेली नाही.

त्यामुळे या प्रकरणी योग्य चौकशी करुन भ्याड हल्ल्यातील आरोपींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हा काॅंग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाकार्याध्यक्ष भुषण गायकवाड व महानगराध्यक्ष आकाश सिरसाट यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here