ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करा;चर्मकार समाज बांधवांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन…

लाखांदूर – नास्तिक लांडगे

सांडपाण्याच्या दुर्गंधी वरून गत 24 ऑगस्ट रोजी जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका कुटुंबातील तिघां विरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.

मात्र दोन दिवस लोटूनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याचा आरोप करून ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी लाखांदूर येथील चर्मकार समाज बांधवांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

सदर निवेदन 26 ऑगस्ट रोजी लाखांदूर तहसीलदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. प्राप्त निवेदनानुसार लाखांदूर येथील प्रभाग 6 मधील अर्चना तांडेकर नामक चर्मकार समाजाच्या महिलेने जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चित्रीवेकर कुटूंबातील तिघाजना विरोधात लाखांदूर पोलिसात तक्रार दाखल केली होती.

तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ॲट्रॉसिटी सह अन्य कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली होती. मात्र गुन्ह्याची नोंद होऊन दोन-तीन दिवस लोटले असताना देखील पोलीस प्रशासनाकडून आरोपींना अटक करण्यात न आल्याने संबंधितांना तात्काळ अटक करा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

सदरचे निवेदन कर्त्यां मध्ये राजकुमार भालाधरे, प्रशांत कटबरे, गेंदलाल कुंभरे, हिरण कटबरे, अहिल्या जगणे कचरू चौबे सचिन बारइ, प्रमोद बारइ यासह अन्य 30 ते 40 नागरिकांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here