५० हजाराची लाच घेतांना वन संरक्षकासह वनपालास अटक…अँटी करप्शन ब्युरोची कारवाई

फोटो सौजन्य गुगल

देवलापार – पुरूषोत्तम डडमल

वन परिक्षेत्र , वन विभाग , रामटेक येथील सहाय्यक वन संरक्षक संदिप गिरी(५२ )व पवनी वन परिक्षेत्रातील सालई राऊंड मधील वनपाल निषादअली हसनअली बाबीनवाले (५३)यांनी ५० हजार रूपयाची लाच स्विकारल्याने त्यांचेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , नागपूरच्या पथकाने कारवाई करून अटक केली. सविस्तर वृत्त असे की,यातील तक्रारदार हे हिवराबाजार येथे राहत असुन ते शेत मजुरीचे काम करतात .

तक्रारदार व इतर ५ व्यक्तींवर भारतीय वन अधिनियम १९२ नुसार वन परिक्षेत्र , वन विभाग , सालई येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच सदर गुन्हयात तक्रारदार व इतर ५ व्यक्तींची ३ वाहने वन विभागाने जप्त केली आहेत . तक्रारदार यांचेविरूध्द दाखल असलेल्या वन अधिनियमाच्या गुन्हयाची एफ.आय.आर. प्रत देण्यासाठी, न्यायालयात दोषारोप पत्र लवकर दाखल करण्याकरीता तसेच तक्रारदार यांचे गुन्हयातुन कमी वगळण्याकरिता वन परिक्षेत्र , वन विभाग , रामटेक येथील सहाय्यक वन संरक्षक संदिप गिरी व वन परिक्षेत्र , वन विभाग, सालई येथील वनपाल निषादअली हसनअली बाबीनवाले यांनी तक्रारदार यांना १ लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांना सहाय्यक वन संरक्षक संदिप गिरी व वनपाल निषादअली हसनअली बाबीनवाले यांनी मागणी केलेली लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथील कार्यालयात येवून तक्रार नोंदविली.त्यानुसार लापलुचपत प्रतिबंधक विभाग,नागपूर येथील पोलीस उपअधीक्षक श्रीमती अनामिका मिर्झापूरे यांनी तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे गोपनियरित्या सापळा रचण्यात आला. त्यामध्ये आरोपी सहाय्यक वन संरक्षक संदिप गिरी व वनपाल निषादअली हसनअली बाबीनवाले यांनी तक्रारदार यांचेविरूध्द दाखल असलेल्या वन अधिनियमाच्या गुन्हयाची एफ.आय.आर. प्रत देण्यासाठी ,

न्यायालयात दोषारोप पत्र लवकर दाखल करण्याकरीता तसेच तक्रारदार यांना गुन्हयातुन कमी करण्याकरीता १ लाख रूपये लाच रक्कमेची मागणी करुन पहिला हप्ता म्हणुन ५० हजार रूपये लाच रक्कम वनपाल निषादअली हसनअली बाबीनवाले यांनी शुक्रवार दिनांक १४/०१/२०२२ रोजी सालई ता . रामटेक येथे स्वतः स्विकारल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , नागपूरच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यावरून त्यांचे विरूध्द पो.स्टे . देवलापार येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला, ला.प्र.वि. नागपूर मिलींद तोतरे,अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. ,नागपूर ,मधुकर गिते , अपर पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक श्रीमती अनामिका मिर्झापूरे, पोलीस निरीक्षक सारंग मिराशी,पो . हवा . दिनेश शिवले , पो.ना सारंग बालपांडे , सुशिल यादव , मंगेश कळंबे , गीता चौधरी , अस्मिता मेश्राम , पो.शि. सुरज भोंगाडे , हरीश गांजरे चापोना अमोल भक्ते , विनोद नायगमकर सर्व ला.प्र.वि. , नागपूर यांनी यशस्वीपणे पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here