विरारमध्ये बँकेवर सशस्त्र दरोडा…व्यवस्थापकाचा मृत्यू…दरोडेखोर कोण?…ऐकून धक्काच बसेल

न्यूज डेस्क – एखाद्या चित्रपटात असलेल्या दृश्या प्रमाणेच काल रात्री विरारमध्ये बँकेवर दरोडा पडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रात्री ८ वाजेच्या सुमारास हि घटना घडली. विरारमधील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेवर काही जणांनी सशस्त्र हल्ला करीत बँक लुटण्याचा प्रयन्त केला. या हल्ल्यात शाखा व्यवस्थापक महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, तर कॅशियर महिला जखमी झाली आहे.

विरार पूर्वेच्या मनवेल पाडा येथे आयसीआयसीआय बँकेची शाखा आहे. गुरुवारी (२९ जुलै) संध्याकाळी बँक बंद झाल्यावर सर्व कर्मचारी निघून गेले होते. त्यावेळी बँकेत रोखपाल श्वेता देवरूख (वय ३२) आणि व्यवस्थापक योगिता वर्तक (वय ३४) या दोघीच होत्या.

रात्री ८ वाजेच्या सुमारास बँकेचा माजी व्यवस्थापक अनिल दुबे बँकेत आला. त्याने चाकूचा धाक दाखवत बँकेतील रोख रक्कम आणि दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोघींनी विरोध केला. दुबे याने दोघींवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात व्यवस्थापक योगिता वर्तक यांचा जागीच मृत्यू झाला, तर रोखपाल श्वेता गंभीर जखमी झाल्या. विरार पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन, दोन्ही जखमी महिला कर्मचाऱ्यांना रुग्णालयात हलविले होतं, मात्र यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

आरोपी दुबे याला सोने आणि पैशाची बॅग घेऊन फरार होत असताना नागरिकांनी पकडले. नागरिकांनी मोठं धाडस दाखवत दरोडेखोर व्यक्तीला पकडून ठेवलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here