तेल्हारा तालुक्यातील वाडी अदमपुर येथे संशस्र दरोडा…पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन दरोडेखोर केले जेरबंद…

न्यूज डेस्क – तेल्हारा पोलीस स्टेशन अतंर्गत वाडी अदमपुर येथे रात्री संशस्र दरोडा पडल्याची माहिती तेल्हारा पोलीसांना मिळताच त्या़नी लगेच अकोट तालुक्यातील पोलीस स्टेशन ला या दरोड्याची माहीती दिली असता अकोट ग्रामीण पोलीस शहर पोलीस यांनी नाका बंदी केली.

आरोपी हे अकोट वरुन अकोला जात असताना आरोपी यांना चोहोट्टा बाजार येथे पोलीस दिसले त्या नंतर त्यांनी गाडी वळवली लगेच परत अकोट कडे जाण्यास सुरुवात केली मात्र आरोपी यांना मीहीती मिळाली की पोलीस आपल्या मागावरच आहेत.

दहीहांडा पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी त्यांचा शोध घेत पळसोद फाट्यावर पर्यत आले त्यांना एका ठिकाणी एक महीला व एक पुरुष हे दोघे एका ठिकाणी लपलेले दिसुन आले लपलेले व्यक्ती हे दरोडेखोरच होते ,दहीहांडा पोलीसांनी त्यांनी यांना पकडुन चोहोट्टा चौकीला घेऊन व नंतर अकोट पोलिसांच्या ताब्यात दिले…

आरोपी कडून एक पिस्टल हि जप्त करण्यात आली असून उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा ठाणेदार विकास देवरे,अकोट ग्रामिण ठाणेदार ज्ञानोबा फड व दहिहांडा पोलीसानची कामगिरी..हिवरखेड,अकोट शहर पोलीसानचा ही सहभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here