रामटेक – राजु कापसे
धार्मीक नैसर्गिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या रामटेक क्षेत्रात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व पर्यटकांच्या आनंद घेण्यासाठी लाईट हाऊस वॉटर पार्कची निर्मिती केलेली असून या क्षेत्रातील पर्यटन विकासाला यामुळे अधिक प्रमाणात गती प्राप्त होईल लहान मनापासून तर प्रत्येक वयोगटातील नागरिकांना पर्यटनाचा आनंद,
या माध्यमातून प्राप्त करता येणार असल्याचे पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे खऱ्या अर्थाने पर्यटन विकास आणि रोजगार निर्मितीचे शिल्पकार ठरतात असे गौरवोद्गार रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने यांनी काढले.
नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील येथे पर्यटन शेत्र रामधाम मध्ये लाईट हाऊस वॉटर पार्कचे उद्घाटन रविवार १४ फेब्रुवारी रोजी करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी आमदार आशीष जयस्वाल, झेडपी सदस्य रश्मी बर्वे ,पोलीस महानिरीक्षक चिरंजीवी प्रसाद, माजी आमदार अविनाश वारजूरकर ,किशोर गजभिये ,नाना गावंडे, सतीश डोंगरे, योगेश्वरी चोखाद्रे,

हुकुमचंद आमधरे, बाबुराव तिडके, महिपाल चौकसे तसेच सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी तथा असंख्य मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते लाईट हाऊस वॉटर पार्क च्या उद्घाटनप्रसंगी पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांच्या पर्यटन व्यवसाय दृष्टीचे कौतुक व गौरव करून अनंत अडचणींचा सामना करून रामटेक क्षेत्रात आकर्षण व पर्यटकांना आकर्षित करणारे पर्यटक स्थळ निर्माण केले आहे.
खिंडसी येथे बोटिंग, कर्मझरी, सिल्लारी येथे रिसॉर्ट, रामधाम मधील धार्मिक व नैसर्गिक पर्यटन आणि नव्याने निर्माण केलेले लाईट हाऊस वॉटर पार्क निर्माण करून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी असून त्यातून रामटेक क्षेत्राच्या परिपूर्ण विकास होऊ शकतो असे विचार उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.
संपूर्ण भारतात पर्यटनासाठी प्रिसद्ध असलेले पर्यटक मित्र म्हणून चंद्रपाल चौकसे यांची प्रिसिद्धी आहे.कोणाकडून कोणत्याही कामा साठी कोणाकडून अपेशा पण त्यांनी केली नाही व आज त्यांनी एक नवीन असा वॉटर पार्क तयार केला कि त्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येथील व लोकांना रोजगार पण मिळेल.रामटेक येथे खिंडसी असो किंवा रामधाम,कृष्णधाम त्यांनी मोठ्या प्रमाणात यातून लोकांना रोजगार मिळवून दिला.

अश्या प्रकारचा रोजगार मिळवून देणे हे हि अत्यंत एका चांगल्या कामासाठी माझं एक योगदान आहे असे ते म्हणतात.माझ्या आईनी बाबा नि मला एकच सांगितलं चांगलं कर्म केले कि त्याच चांगलं फळ मिळते म्हणून त्यांचं काम मी करत आहे व पुढेही पण करीत राहील.