आराधना कोकाटे यांनी राम नवमीनिमिताने जेष्ठ नागरिकांना दिला मदतीचा हात…

मुंबई – धीरज घोलप

कोविड-१९ या महामारी काळात प्रत्येकजण आपआपल्या परीने जी काही मदत करता येईल ती करत होता. बोरीवली येथील रहिवाशी आराधनाताई कोकाटे याही याला अपवाद नाहीत.त्यांनी आवश्यक तेथे जी-जी गरज होती तेथे तेथे गरजेनुसार मदतीचा हात दिला.

आज दि.२१ एप्रिल २०२१ रोजी राम नवमीचे औचित्य साधून ईशान्य मुंबईतील घाटकोपर पश्चिम अमृत नगर सर्कल, बंबखाना व पार्क साईट येथील जेष्ठ नागरिकांना अन्नधान्य किट देऊन मदतीचा हात देण्याची महत्वपुर्ण कामगिरी बजावली. किटचे वाटप(वाटप करताना फोटो सुध्दा न घेता) कोकाटे मँडम यांनी केले.

नव्या जुन्या पिढीतला बेबनाव अनेक घरातून दिसून येतो.आणि बऱ्याचदा ज्येष्ट नागरिकांच्या वाट्याला दुःख निराशा येते.आयुष्याच्या संध्याकाळी ते व्यथित होतात.ते सुखी कसे होतील हे पहाणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे मत आराधना कोकाटे यांनी बोलताना व्यक्त केले.

आज राम नवमी निमिताने ईशान्य मुंबईतील घाटकोपर,विक्रोळी येथे गरजवंत जेष्ठ नागरिकांना अन्नधान्य किटचे वाटप केल्याबद्दल अनेकांनी आराधना कोकाटे यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा व आशिर्वाद दिले.तर अमृत नगर,बंबखाना व पार्क साईट येथील जेष्ठ नागरिकांकडून कोकाटे मँडम यांचे आभार व्यक्त करत त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असे आशिर्वादही दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here