राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश पार्टीच्या संघटक सचिव पदी श्री.शेखर माने यांची नियुक्ती…

सांगली – ज्योती मोरे

माजी नगरसेवक राष्ट्रवादीचे नेते, यांची आज मुंबई येथे जलसंधारण मंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांनी श्री.शेखर माने यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश पार्टीच्या संघटक सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र आज मुंबई येथे शेखर माने यांना देण्यात आले.

शेखर माने हे दोनदा महापालिकेचे नगरसेवक होते. राष्ट्रवादी युवकचे शहरजिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. महापालिकेत उपमहापौर गटाचे नेतृत्व केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेत महापौर करण्याकरिता शेखर माने यांचा मोलाचा वाटा होता.

तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून शहरातील विविध समस्या वरील उपाय योजना व महापालिका क्षेत्रातील विकास कामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होणे करिता सदैव पाठपुरावा करणे कामी ते नेहमी अग्रेसर असतात. कोरोना, महापूराच्या काळात जनतेला मदतीचा हात दिला आहे. शहरातील व्यापार्‍यांचे प्रश्न

सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या विविध कार्याची दखल घेऊन जलसंधारण मंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी त्यांना महाराष्ट्र राज्य पातळीवर पक्षाच्या संघटनात्मक कामाची जबाबदारी सोपवली आहे. सदर निवड प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री मेहबूब शेख व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज तसेच कर्नाळ गावचे नेते राजू पाटील व कर्नाळ चे उपसरपंच युवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here