अखिल भारतीय चित्रपट महामंडळ वर त्वरित प्रशासक नेमावा – बाबासाहेब पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभाग…

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्ष व संचालक मंडळाचा आज कार्यकाळ संपुष्टात आला आहे. दरम्यान गेल्या दोन महिन्यपूर्वी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने त्वरीत प्रशासक नेमावा अशी मागणी कोल्हापूर धर्मादाय आयुक्तांकडे करण्यात आली होती.दरम्यान अद्यापही नियुक्ती संदर्भातली कार्यवाही झालेली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळ कोल्हापूर च्या शाखेशी संलग्न असलेला महाराष्ट्रातला कलावंताचे एक मोठं संघटन आहे या संघटनेत सर्व प्रकारचे चित्रपट निमिर्ती संस्था, कलावंत बॅकस्टेज कलाकार इत्यादी सह किमान 45 हजाराच्या जवळपास सभासद संख्या आहे.त्यामुळे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ अतिशय प्रतिष्ठेचा आणि कलावंताच्या विश्वासाचा संघटन म्हणून प्रसिद्ध आहे.

त्यामुळे महाराष्ट्र शासन व इतर संघटना अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वैचारिक भूमिकेवर मार्गक्रमण करत असते. तसेच दर पाच वर्षांनी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते दरम्यान गेल्या पाच वर्षात विविध आंतरिक विषयांमुळे संचालक मंडळ व अध्यक्ष यांच्या कारभारावर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

मग करोना काळातील गरजवंत कलावंताना मदत वाटपाचा मुद्दा असोत किंवा आर्थिक घोळ असोत नेहमी स्थानिक कलावंतांच्या प्रश्नांना बगल देऊन आर्थिक लाभापोटी अध्यक्ष व संचालक मंडळाने गेल्या पाच वर्षात केलेल्या कारभारावर अनेक सभासद असंतुष्ट असल्याने अनेकदा विविध प्रकारचे आरोप संस्थे अंतर्गत अध्यक्ष व संचालक मंडळ यांच्यावर करण्यात आले आहेत.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आतल्या सभासदांनी मधली एकच भूमिका समोर आली आहे की अध्यक्ष व संचालक मंडळ यांना आम्ही पाच वर्षे दिली असताना या पाच वर्षात अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी कधीही कलावंत,निर्मिती संस्था, बॅकस्टेज कलाकार, यांच्याहितासाठी काम केले नाही.मग कलावंतांच्या साठी ठोस अशी घरकुल योजना,

किंवा कलावंताच्या आरोग्यासाठी कुठल्या प्रकारची शासकीय योजना किंवा कलावंतांसाठी असलेली मानधना योजनेत मानधन वाढविण्याकरीता केलेले पाठपुराठा व चित्रपट निर्मिती संस्था यांना सातत्याने चित्रपट अनुदानापासून वंचित का ठेवले जाते यावर शासन दरबारी साधी विचारांना सुद्धा कधीं करण्यात येऊ नये ही बाब खरंच अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा सारखं मोठा संघटन चालवणाऱ्या अध्यक्षाच्या लक्षात येऊ नये ही बाब मुळातच पचनी पडण्यासारखी नसल्याचं अनेक जाणकारांचे मत आहे.

गेल्या वर्षभरापासून करोनामुळे चित्रपट निर्माते कलावंत बॅकस्टेज कलाकार यांना उपासमारीची वेळ आली आहे अशा परिस्थितीत एक संघटन म्हणून व संघटनेचे पालक म्हणून अध्यक्ष व संचालक मंडळाने अतिशय ठोस निर्णय घेणे अपेक्षित होते जेणेकरून कलावंतांच्या आर्थिक समस्येतून होणारी उपासमार थांबली असती व त्यांना काहीतरी मदत मिळाली असती.

मात्र अध्यक्ष व संचालक मंडळाने असे कुठलेही ठोस मदत कलावंतांना मिळून दिली नाही त्यामुळे सुद्धा अनेक कलावंत संचालक मंडळावर नाराज आहेत मात्र या महामारी च्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी माननीय शरद पवार साहेब व सुप्रियाताई सुळे यांना कलावंतांच्या आर्थिक स्थितीची माहिती देऊन पक्षाच्यावतीने गतवर्षी आर्थिक व अन्नधान्याची मदत मोठ्या प्रमाणात करून दिली जे काम अध्यक्ष म्हणून चित्रपट महामंडळाचा होतं ते काम मात्र एका राजकीय पक्षाने केल्याने अनेक कलावंतांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या अध्यक्ष विषयी नाराजीचा स्वर व्यक्त केला आहे.

म्हणून कार्यकाळ संपलेला असतांनाही परत अध्यक्ष व संचालक मंडळाने पुढील काळात होऊ घातलेल्या निवडणुकीपूर्वी कुठल्याही प्रकारचे गोड बंगाल करू नये या उद्देशाने त्वरित त्यांना पदमुक्त करून धर्मदायआयुक्तांनी त्वरित प्रशासक नेमून अखिल भारतीय चित्रपट महामंडळ जे कलावंताच्या आस्थेचे मंदिर आहे त्याला कुठला धोका पोहोचू नये या करीता परत अध्यक्षांकडे कारभार राहून देता प्रशासक नेमून भविष्यातील होणाऱ्या नुकसानीला आळा घालावा ही विनंती केली आहे.

तर गेल्या तीन महिन्यापासून बाबासाहेब पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चित्रपट सांस्कृतिक विभाग यांनी धर्मदाय आयुक्तांकडे वेळोवेळी पाठपुरावा करून प्रशासक नेमणूक किती अगत्याचे आहे हे कळविले आहे. त्यामुळे धर्मदाय आयुक्तांनी त्वरित प्रशासक नियुक्त करून लवकरात लवकर निवडणुका जाहीर करावा अशी विनंती केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here