शासकिय कर्मचारी विरोधातील अर्ज मागे घेण्यासाठी पाच हजाराची खंडणी स्विकारतांना एकाला रंगेहात पकडले…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागातील अव्वल कारकुन प्रेमानंद लाठकर यांच्या विरोधात खोट्या तक्रारी देणाऱ्या बालाजी जोगदंड या व्यक्तीने खंडणीसाठी तगादा लावला होता. लाठकर यांच्यावर खोटे आरोप करीत बदलीचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात देऊन बालाजी जोगदंड याने लाठकर यांना मोठ्या रक्कमेची मागणी करत तगादा लावला होता.

त्याच्या छळाला कंटाळून लाठकर यांनी वजिराबाद पोलिस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिल्यानंतर जोगदंड याला सापळा रचून 5 हजार रुपयाची खंडणी स्विकारतांना व्हीआयपी रोड नांदेड येथे पंचासमक्ष ताब्यात घेतले. याबाबत नांदेडचे तहसिलदार किरण अंबेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली.

अव्वल कारकुन प्रेमानंद लाठकर यांची तात्काळ बदली करण्यात यावी यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात बालाजी जोगदंड याने अर्ज केला होता. त्या नंतर लाठकर यांना जोगदंड हा वारंवार मोबाईलवर कॉल करुन तुमच्या विरोधातील अर्ज मागे घेतो मला गाडी घ्याावयाची आहे,

तुम्ही मला भेटा फोनवर बोलता येत नाहीत, असे वारंवार भेटण्याोसाठी बोलवत होता. अप्रत्याक्षरित्या जोगदंड हा पैशाची मागणी करत असल्याने लाठकर यांनी पोलीस स्टेरशन वजीराबाद नांदेड येथे त्याच्या विरुद्ध 19 नोव्हेंबर रोजी तक्रार दिली होती.

लाठकर यांना 20 नोव्हेंबर रोजी बालाजी जोगदंडचा कॉल येऊ लागल्या्ने लाठकर यांनी त्यािला थोड्यावेळाने येतो असे म्हजणून टाळाटाळ केली. त्यानंतर लाठकर यांनी पोलीस स्टेठशनला याबाबतची माहिती देवून कार्यवाही करण्यायबाबत विनंती केली.

याच दरम्यान बालाजी जोगदंडचा कॉल येत असल्याने लाठकर यांनी त्या चा कॉल उचलून त्याबच्याशी बोलत असता त्यागने नांदेड जिल्हाठ परिषदेच्या इमारत परिसरातील गोकुळ ज्युेस सेंटर येथे एकटेच या असे सांगीतले. त्याोवेळी सहपोलीस निरीक्षक श्री. मरे यांनी दोन पंचांना बोलावून पंचासमक्ष लाठकर यांच्याकडील भारतीय चलनातील पाचशे रुपयाच्या 10 नोटाचे क्रमांक लिहुन पंचनामा केला.

त्यापनंतर आशिष अंबोरे व बिरादार हे एक पंच सुरुवातीला गोकूळ ज्यु स सेंटर येथे जावून बसल्यानंतर पाच ते दहा मिनीटांनी लाठकर पोहचल्यानंतर काही वेळात बालाजी जोगदंड तेथे आला व लाठकर यांना बाजुला घेवून बाहेर जावू असे सांगितले. त्याववेळेस लाठकर यांच्या दुचाकीवर बालाजी जोगदंडच्या सांगण्याप्रमाणे हिंगोलीगेट अण्णाी भाऊ साठे चौक व्हीआयपी रोडवरील मराठवाडा ऑक्टोकन्स ल्टवन्सीी येथे गाडी थांबविण्यागस त्याने सांगीतले.

त्या‍वेळी पंच व पोलीस पथक हे पाठीमागे येतच होते. लाठकर यांनी गाडी बाजूला लावुन त्याीच्यासोबत बोलत असतांना लाठकरचा अर्ज मागे घेण्यावसाठी जोगदंडने पैशाची मागणी केली. त्याावेळी लाठकर यांनी यांच्याकडील पांढऱ्या कागदात ठेवलेल्याअ भारतीय चलनातील पाचशे रुपयाच्या 10 नोटा एकुण 5 हजार रुपये जोगदंड जवळ दिले.

तेंव्हा जोगदंडने ते स्व तःच्याी शर्टच्याु खिशात ते ठेवले. तेंव्हाच सहपोलीस निरीक्षक श्री. मरे यांनी पंचासमक्ष सदर रक्कम जप्त केली. बालाजी जोगदंड याने पैशाची मागणी केल्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी असा जबाब श्री. लाठकर यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिला आहे, अशी माहिती नांदेड तहसिलदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here