विविध क्षेत्रातील प्रशिक्षणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन…

मुंबई – मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात किमान कौशल्य विकास कार्यक्रम जिल्हास्तरीय सर्वसाधारण योजना व प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेअंतर्गत विविध क्षेत्रातील प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच दादर, आग्रीपाडा, लोअर परेल, मांडवी येथील शासकीय तंत्रशाळा तसेच खाजगी प्रशिक्षण संस्थामार्फत पॉवर, टेलिकॉम, कन्स्ट्रक्शन, अॅपरल, इलेक्ट्रॉनिक्स, रिटेल इत्यादी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांकरीता सर्व्हेअर, ई-वेस्ट कलेक्टर, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन टेक्निशियन, मोबाईल फोन हार्डवेअर रिपेअर टेक्निशियन,

डिस्ट्रीब्युशन लाईनमन, रिटेल ट्रेनी असोसिएट, हॅन्ड ॲब्रायडर, सेल्फ एम्प्लॉईड टेलर, सुइंग मशीन ऑपरेटर इत्यादी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात मुलुंड, कुर्ला, गोवंडी, अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच पात्र खाजगी प्रशिक्षण संस्थांमार्फत आयटी,

पॉवर, टेलिकॉम, टूरिजम, रिटेल, हेल्थकेअर, ऑटोमोटीव्ह इत्यादी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांकरीता डाटा एन्ट्री ऑपरेटर, वेल्डर, कॅप्टन, शेफ, कार वॉशर, कॉम्प्युटर नेटवर्कींग, जनरल ड्युटी असिस्टंट, रिटेल ट्रेनी इत्यादी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत.

हे प्रशिक्षण कार्यक्रम मोफत असून याकरीता अभ्यासक्रमांच्या आवश्यकतेनुसार इयत्ता पाचवी पास ते दहावी पास, आयटीआय, पदविकाधारक, पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना परिक्षेअंती रोजगार, स्वयंरोजगाराची संधी देखील प्राप्त होणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी मुंबई शहर कार्यालयाकडे ०२२-२२६२६३०३ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा [email protected] या ईमेलवर तर मुंबई उपनगर कार्यालयाकडे ०२२-२२६२६४४० या दूरध्वनी क्रमांकावर अथवा [email protected] या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here