Thursday, June 1, 2023
HomeBreaking News'अनुपमा' फेम अभिनेता नितीश पांडे यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी निधन…टीव्ही इंडस्ट्रीवर...

‘अनुपमा’ फेम अभिनेता नितीश पांडे यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी निधन…टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा…

टेलिव्हिजन इंडस्ट्रीला दोन दिवसात दुसरा धक्का बसला आहे. काल मंगळवारी ‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर आता अनुपमा शो मधील रुपाली गांगुलीची मैत्रिण देविकाच्या पतीची भूमिका करणाऱ्या नितीश पांडे यांचे निधन झाले आहे. या दुखद बातमीने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. या बातमीवर कोणाचाही विश्वास बसत नाहीये.

काल रात्री अनुपमा फेम नितीश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अभिनेत्याचे वय अवघे ५१ वर्षे होते, मात्र या वयातही त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला. नितीश पांडे बराच काळ टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करीत होते आणि अनुपमा या शोमध्ये नियमितपणे दिसत होते. आता या बातमीमुळे कुटुंबीयच नाही तर चाहतेही शोकसागरात बुडाले आहेत. ही बातमी सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

लेखक सिद्धार्थ नागर यांनी नितीश पांडे यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लेखकाने फेसबुक पोस्टद्वारे चाहत्यांना याची माहिती दिली आहे. त्यानंतर एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने याची पुष्टी केली आहे. लेखकाने सांगितले की, नितीश शूटिंगसाठी इगतपूरला गेले होते. तेथे रात्री दीडच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर ते आमच्यासोबत नसल्याची माहिती मिळाली.

अभिनयाच्या जोरावर सर्व काही मिळवले

अभिनेता नितीश पांडेने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. 17 जानेवारी 1973 रोजी जन्मलेल्या नितीश पांडे यांनी टीव्ही जगतात चांगले नाव कमावले होते. एवढेच नाही तर या अभिनेत्याने बॉलिवूडचा किंग खानसोबत ‘ओम शांती ओम’ चित्रपटातही काम केले आहे. अनुपमा शोमधील नितीशच्या व्यक्तिरेखेलाही प्रेक्षकांनी दाद दिली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: